पोल्ट्री व्यवसायात महिलेनी केली लाखांची गुंतवणूक, पण कंपनीने केली अशी फसवणूक

पोल्ट्री व्यवसायात महिलेनी केली लाखांची गुंतवणूक, पण कंपनीने केली अशी फसवणूक

पिंपरी : पोल्ट्री व्यवसायात महिलेची पंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मृगेश जयवंत कदम (रा. इंद्रप्रस्थ हाउसिंग सोसायटी, वडगाव शेरी) व सुधीर सुभाष कापरे (रा. संभाजीनगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सोनल रवींद्र थिटे (रा. रामदासनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली. यातील आरोपी हे गब्बर ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व भागीदार आहेत. तर फिर्यादी थिटे या शेती आणि पोल्ट्री व्यवसाय करतात. 

आरोपींनी फिर्यादीच्या पोल्ट्रीसाठी पाच हजार कोंबड्यांची पिल्ले पुरविण्याचे मान्य करून या पिल्लांना लागणारे खाद्य व औषधे गब्बर ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे पुरविली जाणार असे सांगितले. तसेच, पिल्ले ऐंशी ते शंभर दिवसांची झाल्यानंतर पिल्लांची खरेदीदेखील गब्बर ऍग्राटेक कंपनी करणार, असा करार करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे वारंवार आगाऊ रकमेची मागणी केली. त्यामुळे फिर्यादीने एका बॅंकेचे कर्ज काढून सात लाख रुपये आरोपीच्या कंपनीला चेकद्वारे दिले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगाऊ रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी खोटी आश्‍वासने देत फिर्यादीशी बोलणे टाळले. फिर्यादीला गब्बर ऍग्रोटेक प्रायव्हेट लि. कंपनीकडून पंधरा लाख रुपये येणे असताना आरोपींनी फिर्यादीला बारा लाखांचा धनादेश दिला. तो धनादेश फिर्यादीने साधना सहकारी बॅंकेत भरला असता, तो वटला नाही. दरम्यान, गब्बर ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक व भागीदार आरोपींनी फिर्यादीची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com