अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ बनविणे, प्रसारित करणे कायद्याने गुन्हा आहे.

पिंपरी : अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकावर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसीम कमाली शेख (रा. गुरूद्वारा रोड, बिजलीनगर, आकुर्डी) असे आरोपीचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ बनविणे, प्रसारित करणे कायद्याने गुन्हा आहे, तरीही आरोपीने बेकायदेशीररित्या अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ बनवून 30 एप्रिलला त्याच्या फेसबुक अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल केला. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या एका संस्थेला याविषयी माहिती मिळाल्यानंतर या संस्थेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर शेख याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ब), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सोशल मीडियाचा गैरवापर 

सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी उपयोग होणे आवश्‍यक असताना अनेकांकडून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. याआधीही काही जणांनी एखाद्या व्यक्तीबाबत राग व्यक्‍त करण्यासाठी अथवा बदनामी करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, यामुळे संबंधित व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, याचे गांभीर्य आरोपीला नसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against one who viral a child videos on social media