VIDEO : चित्रपट, नाट्य कलावंतांना मदतीची अपेक्षा; मुख्यमंत्र्यांना घातले साकडे 

VIDEO : चित्रपट, नाट्य कलावंतांना मदतीची अपेक्षा; मुख्यमंत्र्यांना घातले साकडे 

पिंपरी : गेल्या दोन महिन्यांपासून चित्रपट-नाट्य कलावंत, पडद्यामागील तंत्रज्ञ, कारागीर, लोककलावंत आणि साहित्यिक यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांचे कलाविष्कार बंद पडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नाट्य संमेलन अथवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचा निधी गरजू कलावंतांना आर्थिक मदत देण्यासाठी वापरावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने केली आहे. 

शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी त्याबाबचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. भोईर यांनी म्हटले आहे, की चित्रपट किंवा नाट्य क्षेत्रात काही मोजकेच कलाकार व्यावसायिक असून, उर्वरीत कलावंतांना कोणताच आधार नाही. या लोकांची उपजिविका नाट्य-चित्रपटांच्या प्रयोगांवर चालते. कलाकार, मेकअपमन, शाहीर, साहित्यिक यांची अवस्था बिकट आहे. आमची मदत ही वैयक्तिक आणि मर्यादित स्वरुपाची होत आहे. त्यामुळे त्यांना सरकारची तातडीने भरीव मदत मिळणे गरजेचे ठरत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्य परिषदेच्या शाखांमधून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कलावंत, साहित्यिक यांची नेमकी माहिती मिळू शकेल. या सर्व घटकांना भेदभाव न करता मदत देणे महत्वाचे आहे. नाट्य संमेलन जवळपास रद्द झाले असून, सरकारने त्यावरील 5 ते 10 कोटी रुपयांचा खर्च, किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यांवरील निधी गरजू कलावंतांसाठी खर्च करावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com