पिंपरी-चिंचवड मालवाहतूक व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले

Petrol
Petrol

पिंपरी - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या आंदोलनाने राज्यभर संताप उमटला. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे, तो मालवाहतूक व्यवसायावर. कोरोनापासून संकटात सापडलेला हा व्यवसाय अद्यापपर्यंत उभारीस आला नाही. त्यात डिझेल दरवाढीने डोके वर काढल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड मालवाहतूक व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दहा वर्षांत महागाईत प्रचंड वाढ होऊनही मालवाहतुकीचे दर मात्र ‘जैसे थे’ राहिले आहेत. अर्थसंकल्पातही करामध्ये वाहतूकदारांना कोणतीही सवलत न मिळाल्याची खंत ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक सचिन वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.सध्या पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात लघु उद्योजक दहा हजारांच्या जवळपास आहेत. पुणे शहर, ग्रामीण परिसरात मालाची वाहतूक होते. आयात-निर्यात दहा टक्के इतकी आहे. १ एप्रिल २०२० रोजी डिझेलचा ६५.०५ रुपये असलेला दर ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ८२.४५ पर्यंत पोचला आहे, तर पेट्रोल ९२ रुपयांवर गेले आहे. 
तब्बल दहा महिन्यांत १७ रुपयांनी डिझेलचे दर वाढले. 

लॉकडाउनपासून विस्कटलेली घडी अद्याप रुळावर आलेली नाही. कंपनीत मनुष्यबळाची कमतरता आहे. सध्या शहरातील एका मालवाहतूक ट्रिपसाठी आम्ही ६०० ते ७०० रुपये देतो, तर टनाच्यामागे ३०० ते ४०० रुपये दर आकारला जात आहे. आम्ही भाडेवाढ सध्या देण्यास तयार नाही. औद्योगिक प्रगती मंदावलेली आहे.
- प्रकाश गोरे, अध्यक्ष, परम इंडस्ट्रीज 

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सर्वाधिक शहरात आहेत. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांचेही हाल सुरू आहेत. त्यांना सीएनजीवर वाहने चालविता येत नाहीत. कच्च्या मालाच्या प्रक्रियेनंतर पुन्हा वाहतूक दरात बदल होतो. मात्र, कंपन्यांना मालवाहतुकीचे दर वाढल्यास परवडणार नाहीत. सध्या किलोमागे दीड ते दोन रुपये खर्च येत आहे.   
- जयदेव अक्कलकोटे, संस्थापक अध्यक्ष, चाकण एमआयडीसी फेज तीन लघुउद्योजक संघटना

कमीत-कमी १५ ते २० टक्के मालवाहतूक दरात वाढ अपेक्षित आहे. जानेवारीपासून होणारे करार कंपन्यांनी केले नाहीत. जुन्या दरात बदल झालेला नाही. वाहतूकदारांची कोंडी सुरू आहे. सबसिडी नाही. काही दिवसांनी ट्रकमालक आत्महत्या करतील अशी परिस्थिती आहे. या सरकारने घोर निराशा केली आहे.   
- प्रमोद भावसार, सहअध्यक्ष, ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com