
सरिता जाधव व कैलास जाधव हे दोघेही रेल्वे पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत टेरेसवर जाण्याच्या कारणावरून सोसायटीतील रहिवासी आरोपी मुलगुंड याने सुरक्षारक्षकास फिर्यादीस चावी न देण्यास सांगितले. संचारबंदी असतानाही 30 ते 35 लोकांना एकत्र जमा केले. फिर्यादी व त्यांच्या आईला वयस्कर खाली बोलावून मुलगुंड, खन्ना, पगारे, शहा यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात दमदाटी केली. तसेच 25 डिसेंबरला फिर्यादीचे वडील लिफ्ट कधी सुरू होणार याबाबत सुरक्षारक्षकाला विचारत असताना मुलगुंड याच्याशी बाचाबाची झाली.
पिंपरी : "मी पोलिस आहे, मी सटकलो की तुला शूट करीन, माझ्याकडे पिस्तूल असून तुला ठार करीन, अशी धमकी देत महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिस दाम्पत्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सरिता कैलास जाधव, कैलास जाधव , मिठी कैलास जाधव, विनायक मुलगुंड, दीबोज्योती शहा, खन्ना, पगारे (सर्व रा. गणेश हेरिटेज, दापोडी) व इतर रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वाती दिलीप कदम (वय 34, रा. गणेश हेरिटेज, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
सरिता जाधव व कैलास जाधव हे दोघेही रेल्वे पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत टेरेसवर जाण्याच्या कारणावरून सोसायटीतील रहिवासी आरोपी मुलगुंड याने सुरक्षारक्षकास फिर्यादीस चावी न देण्यास सांगितले. संचारबंदी असतानाही 30 ते 35 लोकांना एकत्र जमा केले. फिर्यादी व त्यांच्या आईला वयस्कर खाली बोलावून मुलगुंड, खन्ना, पगारे, शहा यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात दमदाटी केली. तसेच 25 डिसेंबरला फिर्यादीचे वडील लिफ्ट कधी सुरू होणार याबाबत सुरक्षारक्षकाला विचारत असताना मुलगुंड याच्याशी बाचाबाची झाली. याचा व्हिडीओ सोसायटीच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर टाकल्याने याबाबत फिर्यादीने विचारले असता सीसीटीव्ही फुटेज वापरून खोटा गुन्हा दाखल करण्याची त्यांना धमकी दिली.
दरम्यान, सरिता जाधव, कैलास जाधव, मिठी जाधव, मुलगुंड व शहा यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर 30 डिसेंबरला फिर्यादी या गॅलरीत फोनवर बोलत असताना सरिता जाधव यांची मुलगी फिर्यादीचा व्हिडीओ काढत होती. त्यावेळी फिर्यादीने शुटींग काढू नको असे सांगितले असता सरिता जाधव यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच कैलास जाधव यांनीही फिर्यादीला शिवीगाळ करीत "मी पोलिस आहे, मी सटकलो की तुला शुट करीन, तुझे आयुष्य बरबाद करून टाकीन, तुला ठार करीन, माझ्याकडे पिस्तूल आहे' असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.