पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच शंभरच्या खाली नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

गेल्या आठ जून रोजी एका दिवसात शंभर पेक्षा अधिक पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यापूर्वी अर्थात पहिला रुग्ण आढळला त्या दहा मार्च पासून सात जून पर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत दररोजचा आकडा शंभरच्या आत राहिला होता. मात्र आठ जून पासून सहा नोव्हेंबरपर्यंत दररोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. जुलै व ऑगस्टमध्ये हा आकडा दिवसाला दीड हजार पर्यंत गेला होता.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 97 रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यांतील आज सर्वात निचांकी आकडा असून पाच महिन्यांत पहिल्यांदाच शंभरच्या खाली राहिला आहे. शहरासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठ जून रोजी एका दिवसात शंभर पेक्षा अधिक पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यापूर्वी अर्थात पहिला रुग्ण आढळला त्या दहा मार्च पासून सात जून पर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत दररोजचा आकडा शंभरच्या आत राहिला होता. मात्र आठ जून पासून सहा नोव्हेंबरपर्यंत दररोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. जुलै व ऑगस्टमध्ये हा आकडा दिवसाला दीड हजार पर्यंत गेला होता.

दरम्यान, आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या 88 हजार 678 झाली आहे. आज 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 85 हजार 374 झाली आहे. सध्या एक हजार 758 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. 

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 546 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 639 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष जुनी सांगवी (वय 85 व 45), काळेवाडी (वय 70) आणि महिला निगडी (वय 69) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब आहे.  

शहरात सध्या बाहेरील 167 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील एक जण पॉझिटीव्ह आढळले. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 790 रूग्ण उपचार घेत आहेत. 969 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

 महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time in last 5 months less than 100 positive patients found in a day in pimpri