
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तीन महिन्यांपासून वाहनचालक परवाने टपालाने पाठविले गेले नाहीत. त्यामुळे "ड्रायव्हिंग टेस्ट' देऊनही पाच हजार जणांच्या हातात परवाने पडलेले नाहीत. रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्याने गाडी चालवायची कशी? असा प्रश्न सध्या या वाहन चालकांना पडला आहे.
पिंपरी - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तीन महिन्यांपासून वाहनचालक परवाने टपालाने पाठविले गेले नाहीत. त्यामुळे "ड्रायव्हिंग टेस्ट' देऊनही पाच हजार जणांच्या हातात परवाने पडलेले नाहीत. रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्याने गाडी चालवायची कशी? असा प्रश्न सध्या या वाहन चालकांना पडला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आरटीओकडून वाहन चालवण्याचा पक्का परवाना, वाहनाचे नोंदणीपत्र टपाल विभागाच्या स्पीड पोस्टाने घरपोच पाठवले जाते. त्यासाठी टपाल खर्च म्हणून प्रत्येकी पन्नास रुपये स्वतंत्र आकारले जातात. कार्यालयात दररोज सुमारे एक हजार जणांची सर्व प्रकारच्या परवान्यासाठी नोंद होते. त्यात 300 ते 400 नागरिक वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी कार्यालयात येत असतात. चालकाने "टेस्ट' दिल्यानंतर आठ ते दहा दिवसात पोस्टाने परवाना मिळणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांच्या हातात परवाना मिळालेला नाही. अनेकजण टपाल कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. अनेकजण दिवसांतून दहा-दहा वेळा फोन करीत आहेत.
तेराव्या मजल्यावरून उडी मारून सीएची आत्महत्या; रहाटणीतील घटना
रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून सतत तपासणी मोहीम सुरू असते. ज्यांच्याकडे परवाने नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पावती दाखवूनही पोलिसांकडून सूट मिळत नाही. आरटीओच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आम्हाला का? असा प्रश्न निगडीतील वाहनचालक सुहास जाधव यांना पडला आहे.
Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 159 नवे रुग्ण
'मनुष्यबळाचा अभाव असल्याने अद्याप पाच हजार परवाना टपालाने पाठवायचे काम बाकी राहिले आहे. येत्या आठवडाभरात ते पाठविण्यात येतील. सुटीदिवशी परवाना काढण्यासाठी नोंद केली जात असल्याने संख्या वाढत आहे.'
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड
Edited By - Prashant Patil