वाकडमध्ये हे काय चाललंय, एका आयटी अभियंत्याच्या आत्महत्येची शिक्षा बॅचलर तरुणांना?

वाकडमध्ये हे काय चाललंय, एका आयटी अभियंत्याच्या आत्महत्येची शिक्षा बॅचलर तरुणांना?

पिंपरी : वाकड येथील लॉरेल सोसायटीत आयटी अभियंता तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर या सोसायटीत राहणाऱ्या बॅचलर तरुणांना दोन महिन्यांत फ्लॅट खाली करण्याची सक्ती सोसायटीने केली आहे. या बाबत सोसायटीचे परिपत्रकही काढले आहे. ऐन लॉकडाउनच्या कालावधीत अशा प्रकारचे परिपत्रक काढल्याने बॅचलर तरुणांवर मोठे संकट ओढावले. मात्र, पोलिसांनी सूचना दिल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. 

वाकडमधील लॉरेल सोसायटीत राहणाऱ्या एका आयटी अभियंता तरुणाने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरूण सुरुवातीला बॅचलर राहत होता. दरम्यान, त्याचे याच सोसायटीतील एका तरुणीशी प्रेम जुळले. काही कालावधीनंतर तो तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागला. दरम्यान, सोबत राहत असतानाच त्यांच्यात भांडण झाल्याने या तरूणाने 28 मे रोजी उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे येथे भाड्याने राहणाऱ्या बॅचरल तरुणांचा मुद्दा उपस्थित झाला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सोसायटीने नवीन परिपत्रक काढले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सोसायटीत घडलेली घटना गंभीर आहे. यामध्ये अनेकांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. यामुळे पोलिसांना सहकार्य करण्यासाठी यापुढे भाडेकरूंची नोंद ठेवण्यासह येत्या दोन महिन्यांत बॅचलर मुलांनी फ्लॅट रिकामे करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र, ऐन लॉकडाउनच्या कालावधीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याने बॅचलर तरुणांवर मोठे संकट ओढावले. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी यामध्ये लक्ष घालत अशा प्रकारची कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले. यामुळे बॅचलर तरूणांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या प्रकरणाबाबत आपण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी बॅचलर तरुणांबाबतचे परिपत्रक मागे घेणार असल्याचे सांगितले आहे. 

- विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com