Video : देवेंद्र फडणवीस यांची वायसीएम रुग्णालयाला भेट, अधिकाऱ्यांना म्हणाले...

Video : देवेंद्र फडणवीस यांची वायसीएम रुग्णालयाला भेट, अधिकाऱ्यांना म्हणाले...

पिंपरी : माजी मुख्यमंत्री व विधानसभचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज मंगळवारी (ता. 23) पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील वायसीएम रुग्णालयात दुपारी पावणे एकच्या सुमारास ते पोचले. त्यांनी तेथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांची सुमारे तासभर बैठक घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण अकरा मार्चला आढळला होता. त्यानंतर संख्या वाढत गेली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लाॅकडाउन झाले. परंतु एकवीस मे नंतर हळूहळू नियम शिथिल केले. लोक घराबाहेर पडू लागले आणि रुग्ण संख्याही वाढू लागली. काल सोमवार, २२ जूनचा आकडा सर्वात धोकादायक ठरला. एका दिवसात तब्बल १६४ जण पाॅझिटीव्ह आढळले आणि चार जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंचा पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याचा व मृत्यू संख्येचा हा उच्चांक ठरला. शहरासाठी ही धोक्याची सूचना आहे, असे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री व विधानसभचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. महापालिकेत भाजपची सत्ता आहे, या पार्श्वभूमीवर फडणवीस महापालिका कारभा-यांना काय सूचना दिल्या.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार
 
दरम्यान, तासभर फडणवीस वायसीएममध्ये थांबले. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर ते मोटारीने पुण्यातील नायडू रुग्णालयाकडे रवाना झाले. अडीच वाजता नायडूमध्ये पोहचतील. दुपारी तीन वाजता ससूनमध्ये आगमन होईल. साडेतीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचतील. विभागीय आयुक्तांसमवेत बैठक होईल. बैठक संपवून सायंकाळी सहा वाजता मोटारीने आपटे रोड येथील श्रेयस बॅक्‍वेट हॉलमध्ये पोचतील. त्यानंतर मुंबईकडे प्रयाण करतील. त्यांच्यासमवेत विशेष कार्य अधिकारी दिलीप राजूरकर असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com