अखेर तीन दिवसानंतर सापडला तुंगार्ली धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास अमित हा तुंगार्ली धरणात पोहत असताना अचानक पाण्यात बेपत्ता झाला होता.  भाऊ आणि मित्रांनी अमितला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. अमितचा भाऊ अजय गुप्ता (वय-२९) याने याबाबत पोलिसांना खबर दिली. घटना घडल्यापासून शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाकडून  तीन दिवस अमितचा शोध सुरू होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली. अखेर बुधवारी दुपारी अमितचा मृतदेह शोधण्यास यश आले.

लोणावळा : लोणावळा परिसरात सोमवारी (ता.१६) पर्यटनासाठी आलेला अमित गुप्ता (वय-२४, रा. शांतीनगर, तुंगार फाटा, वसई) हा तरुण येथील तुंगार्ली धरणात बुडाल्याची भीती व्यक्त होत होती. अखेर तीन दिवसानंतर अमित याचा मृतदेह शोधण्यात येथील शिवदुर्ग मित्र व एनडीआरएफच्या पथकास यश आले आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अमितचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृत अमित हा आपले भाऊ व मित्रांसमवेत सोमवारी पर्यटनासाठी लोणावळ्यात आले होते.

आमदार तापकीर यांच्या कपात सूचनेला गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांचे उत्तर

दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास अमित हा तुंगार्ली धरणात पोहत असताना अचानक पाण्यात बेपत्ता झाला होता.  भाऊ आणि मित्रांनी अमितला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. अमितचा भाऊ अजय गुप्ता (वय-२९) याने याबाबत पोलिसांना खबर दिली. घटना घडल्यापासून शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाकडून  तीन दिवस अमितचा शोध सुरू होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली. अखेर बुधवारी दुपारी अमितचा मृतदेह शोधण्यास यश आले.

आमदार तापकीर यांच्या कपात सूचनेला गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांचे उत्तर

पोलीस कर्मचारी पवन तायडे, शिवदुर्ग मित्रचे केदार देवळे, सागर कुंभार, प्रविण देशमुख, अजय शेलार, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, दुर्वेश साठे, सतिष मलगुडे, अशोक उंबरे, अभिषेक गायकवाड, राजेंद्र कडु, पुनिकेत गायकवाड, सारंग गायकवाड, विकास मावकर ,राजु पाटील, सुनिल गायकवाड भगवान घनवट, अनिल सुतार, आनंद गावडे, अनिल आंद्रे, चंद्रकात बोंबले आदींच्या पथकाने मदतकार्य करत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: found body of a young man who drowned in Tungarli dam after three days