वाकड परिसरातील वीजवाहिनीत बिघाड; नागरिकांची रात्र अंधारात

वाकड परिसरातील वीजवाहिनीत बिघाड; नागरिकांची रात्र अंधारात

पिंपरी : औद्योगिक सुटीच्या दिवशी गुरुवारी जोरदार पाऊस व खंडित वीज पुरवठ्याचा सामना नागरिकांना करावा लागला. शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर वाकड परिसरात वीजवाहिनीत बिघाड झाल्याने काही भागात सुमारे चार तास वीजपुरवठा खंडित होता. तर, देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी दुपारी सुमारे अडीच तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकड परिसरातील मुख्य वीज वाहिनीत बुधवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला. त्यामुळे सोळा नंबर बस थांबा, कावेरीनगर, काळेवाडी फाटा ते डांगे चौक दरम्यानच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने वीज वाहिनी दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घेतले. मात्र, दुरुस्तीचे काम सुमारे चार तास सुरू होते. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. 

दरम्यान, गुरुवारी औद्योगिक सुटीमुळे वीज वाहिन्यांच्या नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी दुपारी सुमारे अडीच तास पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी कॅम्पसह गावठाणालगतच्या काही भागात वीज गायब होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात कधी जोरदार, तर कधी तुरळक स्वरूपात पाऊस सुरू आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच, मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांना पूर आला असून, कालच्या तुलनेत आज त्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवत नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहर परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी घरीच थांबावे, अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या भागातील कोणत्याही विद्युत खांबाला, ट्रान्सफॉर्मर, डीपी बॉक्‍स, इलेक्‍ट्रिकल्स बोर्ड यांना स्पर्ध करू नये, अशा ठिकाणी जाणे टाळावे, शहरातील पादचारी भुयारी मार्ग (सब-वे) व पाणी साचलेल्या भागातून वाहनांसह किंवा पायी प्रवास करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com