esakal | पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींना मोफत लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींना मोफत लसीकरण

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील दिव्यांग व्यक्तींचे (Handicap people) सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने, महापालिका (pimpri chinchawad corporation) व स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीतील (Bhosari) अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी विनामूल्य कोविड-१९ (covid 19) प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या सामाजिक जबाबदारी विभागाचे (CSR) सहकार्य लाभले आहे. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. (Free covid vaccination for handicap people pimpri chinchawad city)

हेही वाचा: नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश

महापौर उषा ढोरे व स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. हा उपक्रम केवळ दिव्यांग व्यक्तींकरीता असून, दररोज सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नगरसेविका भीमा फुगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा भावसार, प्रशासन अधिकारी नाना मोरे, स्पार्क फाउंडेशनचे नितिका गुल्हाने-लोहे, नीलेश पवळे, सुमेध लव्हाळे, संजय खैरकर , माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्रीकांत बहुलकर यांना जाहीर

यावेळी महापौर आणि इक्वीटस फायनान्स बॅंकेचे अधिकारी संग्राम पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास सी. एस. आर माध्यमातून मदत उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या सी. एस. आर सेल यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.

loading image