कामशेत : जॅकी श्रॉफकडून गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaikwad family and
 Jackie Shroff

कामशेत : जॅकी श्रॉफकडून गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन

कामशेत : सिनेअभिनेते व मावळ वासीयांचे अगदी ऋणानुबंधाचे नातं झाले आहे. हिंदी, मराठी चित्रपटातील सेलेब्रिटी हे नातं हळूवारपणे जपत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार जॅकी श्रॉफ यांनी चांदखेडच्या गायकवाड कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले. जॅकी यांच्या भेटीत गायकवाड कुटुंबीयांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

जॅकी यांचा चांदखेडला फार्म हाऊस आहे, त्याठिकाणी सागर दिलीप गायकवाड हे काम करतात. सागर यांचे वडील दिलीप राजाराम गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली पाच वर्षांपासून सागर हे जॅकी यांच्या फार्महाऊसवर काम करतात. सागरच्या वडीलांचे निधन झाल्याची बातमी कळताच गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जॅकी त्यांच्या घरी गेले. दिलीप यांच्या मातोश्री तान्हुबाई यांची भेट घेतली. तसेच चिमुकल्यांशी जॅकी यांनी संवाद साधला. त्यामुळे गायकवाड कुटुंबीयांचे दु:ख काहीसे हलके झाल्याच्या भावना गायकवाड परिवारातील ज्येष्ठ सदस्य रमेश गायकवाड यांनी व्यक्त केले. मागील वर्षी जॅकी यांच्या घरी काम करणाऱ्या दीपाली तुपे यांच्या आजीचे निधन झाले होते. ही बातमी जॅकी यांना कळल्यानंतर ते त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते.

Web Title: Gaikwad Family Consolation Jackie Shroff Actors And Maval Residents Close Relationship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..