बस प्रवासात लाखोंचा ऐवज लुटणारी महिला चोरट्यांची टोळी हिंजवडीत जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

  • दरोड्याचा गुन्हा दाखल 

पिंपरी : बस प्रवासादरम्यान महिलेसोबत वाद घालून धक्काबुक्की करीत महिलेकडील पावणे दोन लाखांचा ऐवज लुटणाऱ्या महिलांच्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना बेंगलोर हायवेवरील सुतारवाडी ते राधा चौकदरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सारिका राम बुडबुक्की (वय 20), पल्लवी राम बुडबुक्की (वय 22), भवानी मंजेनाथ बुडबुक्की (वय 32), दीपा सेनू बुडबुक्की (वय 22, सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) यासह अन्य दोन महिलांना अटक केली असून, एक महिला फरारी आहे. याप्रकरणी अर्चना मनोहर देवकर (वय 37, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी देवकर या रविवारी (ता. 13) दुपारी तीनच्या सुमारास कराड ते मुंबई बसमधून प्रवास करत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास सुतारवाडी ते राधाचौक दरम्यान बसमधील सात महिलांनी फिर्यादी यांच्याकडे जाऊन वाद घातला. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून बस राधाचौकात थांबली असता आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. तसेच, 10 हजार रुपये रोख रक्कम आणि दागिने, असा एकूण एक लाख 83 हजार 200 रुपयांचा ऐवज घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. याबाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang of female thieves has been arrested in hinjewadi