Sat, June 10, 2023

Crime News : अपहरण प्रकरणात सराईत गुंड बाळा वाघेरेला अटक
Published on : 15 March 2023, 6:25 pm
पिंपरी : सराईत गुंड बाळा वाघेरे (रा. पिंपरीगाव) याला अपहरण प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घरातून अटक केली. याप्रकरणी एका व्यवसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघिरे याच्यासह चौधरी व उणेचा यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. फिर्यादी व चौधरी यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता.
व्यवहारातील सर्व रक्कम फिर्यादी यांनी चौधरी याला दिली होती. तरीही आरोपी पैशांची मागणी करीत होता. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीला एका ठिकाणी नेत पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला असता मारहाण केली. याबाबत फिर्यादीने तक्रार दिली असता वाघिरे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.