VIDEO : आकुर्डीतील राडारोडा कोणी उचलणार का? काय आहेत नागरिकांच्या तक्रारी...बघा

VIDEO : आकुर्डीतील राडारोडा कोणी उचलणार का? काय आहेत नागरिकांच्या तक्रारी...बघा

पिंपरी : गेल्या दोन महिन्यांपासून आकुर्डी येथील रस्त्यावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला आहे. परंतु, वारंवार तक्रार करूनही तो  उचलण्यास कोणी येत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. कोणी कचरायुक्त राडारोडा उचलेल का, अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात पावसापूर्वीच कामांना वेग आला आहे. लॉकडाउन असतानाही या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. इतर  परिसरात कचरा संकलन, राडारोडा उचलणे, रस्ते सफाई आदी कामे सुरूच आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडूनही आकुर्डी भागातील रस्त्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउनपूर्वी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेला राडारोडा उचलण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्या आहेत. वरिष्ठाकडून सूचना करूनही त्याकडे कर्मचारी  दुर्लक्ष करत असून, तो उचलण्यात उदासीनता दाखवीत असल्याची तक्रार के. के. कांबळे व वाहिद पटेल यांनी केली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकुर्डीतील दत्तवाडी ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी राडारोडा पडून आहे. महापालिकेकडून येथे सिमेंटचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. त्याचा राडारोडा तसाच पडून आहे. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर अद्याप दोन महिन्यापासून राडारोडा उचलण्यात आला नाही. त्यामुळे इतर कचराही तेथे साचत आहे. स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. तसेच राडारोडा व कचरा उचलण्याबाबत सांगितले. तरीही कचरा उचलला नसल्यामुळे नागरिक संतापले आहेत

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राडारोडा पडल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. याबाबत अभियंता व उपअभियंता यांना सूचना केली होती. परंतु याविषयी पुन्हा सूचना द्यावा लागतील.
- आशादेवी दुरगुडे, 'अ' क्षेत्रीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com