‘अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल तत्काळ लावा’ | Dr.Babasaheb Ambedkar Technological university lonere | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल तत्काळ लावा’

‘अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल तत्काळ लावा’

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे संलग्न सर्व अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल तत्काळ लावण्याची मागणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी (कॉप्स) विद्यार्थी संघटनेने केली आहे. अध्यक्ष अमर एकाड यांनी तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्‍याचे संचालक डॉ. अभय वाघ यांना निवेदन दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्याकडून अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची हिवाळी २०२० परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. परीक्षा संपून तब्बल ७५ दिवस उलटून गेले तरीही विद्यापीठातर्फे या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यापीठ कायद्यान्वये परीक्षेनंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: Drugs Case : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना जामीन मंजूर

या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली असल्याने प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणी, साक्षांकित प्रति वितरित करणे, किंवा उत्तर पत्रिकांचे पूर्वावलोकन करणे हि कामे विद्यापीठाला करावीच लागत नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही तंत्रशास्त्र विद्यापीठाचे निकाल अडीच महिन्यातही जाहीर करू शकत नसेल तर राज्यातील इतर विद्यापीठाबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय निकाल लागण्यास विलंब होत असताना या बाबतीत विद्यापीठ आपल्या संकेतस्थळावर एखादी सूचना प्रसारित करून विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेण्याचाही प्रयत्न करताना दिसत नाही, हे विशेष.

हेही वाचा: आरोग्य विभाग परीक्षा प्रकरण: न्यासा कंपनीने केला खुलासा

विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेवर न भरल्यास त्यांना दंड आकारला जातो. मग परीक्षेचे निकाल वेळेवर लागत नसतील तर तसाच दंड विद्यापीठाकडून वसूल करून तो विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यायला हवा. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे संलग्न सर्व अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल तत्काळ लावण्याबाबतच निर्देश तत्काळ द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Get Engineering Course Results Immediately Care Of Public Safety

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ResultEngineering Courses
go to top