
प्रेमप्रकरणातून पिस्तूलाच्या धाकाने तरुणाने भर वस्तीतून एका तरुणीचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (ता.19) सकाळी साडे अकराच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयासमोर घडला.
पिंपरी - प्रेमप्रकरणातून पिस्तूलाच्या धाकाने तरुणाने भर वस्तीतून एका तरुणीचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (ता.19) सकाळी साडे अकराच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयासमोर घडला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शंतनू चिंचवडे (वय 25, रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व अपहृत तरुणी यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. अपहृत तरूणी चिंचवड स्टेशन येथील एका ऑफिसमध्ये नोकरीला असून मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर आली होती. दरम्यान, अकराच्या सुमारास आरोपी त्याठिकाणी आला. आरोपीने पिस्तूलाचा धाक दाखवून तरूणीला जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून नेले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबत तरूणीच्या वडिलांना कळविल्यानंतर त्यांनी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळातच आरोपीला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेऊन तरूणीची सुखरूप सुटका केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Edited By - Prashant Patil