esakal | पत्नीचा छळ करीत गर्भपात केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅनवर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पत्नीचा छळ करीत औषधे देवून गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सनी वाघचौरे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीचा छळ करीत गर्भपात केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅनवर गुन्हा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पत्नीचा छळ करीत औषधे देवून गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सनी वाघचौरे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोल्डमॅन सनी नाना वाघचौरे (वय 31), सासू आशा वाघचौरे (वय 56), नाना वाघचौरे (वय 60), नणंद नीता गायकवाड (वय 36, सर्व रा. संतोषीमाता मंदिर चौक, नेहरूनगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या माहेराहून गृहोपयोगी वस्तू घेतल्या. फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करीत धमकी दिली. त्यांना गर्भपाताची औषधे देवून गर्भपात घडवून आणला. दरम्यान, विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस दलात कोरोनाचा तिसरा बळी  

सनी वाघचौरे लाखो रूपये किंमतीचे सोने अंगावर परिधान करून सर्वत्र मिरवित असल्याने त्याची गोल्डमॅन अशी ओळख निर्माण झाली आहे. गळ्यात अनेक सोनसाखळ्या, त्यामध्ये मोठे लॉकेट, हातात ब्रेसलेट, अंगठ्या यासह मोबाईलचा कव्हर, बूटही सोन्याचे वापरतो. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्याकडील आलिशान मोटारीलाही सोन्याची झळाळी दिली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांशी त्याची जवळीक आहे. त्यांच्या इव्हेंटमध्येही सनीची उपस्थिती आहे. बड्या कलाकारांसमवेतचे त्याचे फोटो सोशल मिडियावर सतत झळकत असतात. नावाजलेल्या हिंदी रिऍलिटी शोमध्येही सनीला निमंत्रित करण्यात आलेले आहे. मात्र, गोल्डमॅन म्हणून सर्वत्र मिरविणाऱ्या सनीविरोधात पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

Edited By - Prashant Patil