esakal | पवन मावळ परिसरातील पर्यटन केंद्रांना सुगीचे दिवस 
sakal

बोलून बातमी शोधा

waterfall

मावळी जेवण, शेतीला फेरफटका मारणे, बोटिंगची सोय, विविध खेळ आदी सुविधा देत असल्याने पर्यटकांनी मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहे, ही भावना आहे

पवन मावळ परिसरातील पर्यटन केंद्रांना सुगीचे दिवस 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमाटणे - ""पवन मावळातील कृषी पर्यटन केंद्रात सरकारच्या सर्व नियमाचे पालन करून निवास व परिसराची नियमित स्वच्छता, आरोग्य सुविधा व प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच मावळी जेवण, शेतीला फेरफटका मारणे, बोटिंगची सोय, विविध खेळ आदी सुविधा देत असल्याने पर्यटकांनी मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहे,'' ही भावना आहे कृषी पर्यटन संघटनेचे अध्यक्ष सुरेश कालेकर यांची. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यटक नसल्याने पवन मावळातील धबधबे ओस पडले असून, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा या वर्षीचा व्यवसाय बुडाला, तर कृषी पर्यटनाला चांगले दिवस  आले आहेत. निसर्गसंपन्न वातावरण, डोंगर उतारावरून खळखळत वाहणारे स्वच्छ पाण्याचे धबधबे, येथे मिळणारे ताजे खाद्य पदार्थ यामुळे दरवर्षी पावसाळ्यात मावळातील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. लॉकडाउनमुळे पर्यटनावर बंदी असल्याने गेल्या जूनपासून धबधबे ओस पडले आहेत. लॉकडाउन शिथिल होत गेले. काही नियमाचे पालन करून हॉटेल चालू करण्यासही संमती मिळाली, तरीही पर्यटकांनी धबधब्यांकडे पाठ फिरवली. त्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा पावसाळी हंगाम वाया गेला आहे. ऑक्‍टोबरच्या सुरुवातीपासून पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी कृषी पर्यटन ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यापासून कृषी पर्यटनाचा व्यवसाय चांगला सुरू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा