...म्हणून गृहनिर्माण संस्थांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना चालू ठेवाव्या 

...म्हणून गृहनिर्माण संस्थांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना चालू ठेवाव्या 

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविणे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी चालूच ठेवावे. मास्क, सॅनिटायझर, परिसराचे निर्जंतूकीकरण करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्क्रिनिंग करतेवेळी ऑक्सिमीटरचाही वापर करावा. संबंधित व्यक्तीच्या शरीरातील ऑक्‍सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उपनिबंधक, (सहकारी संस्था, पुणे शहर 3) शाहूराज हिरे यांनी केले आहे. 

राज्य सरकारने प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लॉकडाउन हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना चालू ठेवणे गरजेचे बनले आहे. त्याबद्दल उपनिबंधक हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आवाहन केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिरे म्हणाले, की गृहनिर्माण संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमधून पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना नियंत्रित ठेवण्यात लक्षणीय यश आले आहे. संस्थांची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. मात्र, राज्य सरकारने आता लॉकडाउन काढले आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लॉकडाउनच्या मानसिकतेमधून आता बाहेर यायला हवे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या सूचनेबाहेर जाऊन संस्थांनी स्वतःचे नियम लागू करू नयेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अभ्यांगत, प्लंबर, इलेक्‍ट्रिशन, घरकामगार, गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉय आदी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अत्यावश्‍यक सेवा पुरवठादार व्यक्तींना संस्थेत ये-जा करण्यास मनाई करू नये. मात्र, हे करताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चालूच ठेवणे आवश्‍यक आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. वेळोवेळी सोसायटीच्या आवाराचे निर्जंतुकीकरण करावे. सोसायटीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान नोंदवून घेताना त्याच्या शरीरातील ऑक्‍सिजनची पातळीही मोजावी. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हदयविकार असलेल्या रहिवाशांची विशेष काळजी घ्यावी. निवासी विलगीकरण केलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com