शेवटी नशीब बलवत्तर, प्लाझ्मा मिळाला अन् आजोबा ठणठणीत बरे झाले

शेवटी नशीब बलवत्तर, प्लाझ्मा मिळाला अन् आजोबा ठणठणीत बरे झाले

पिंपरी : प्रचंड खोकला आणि न्युमोनियाने आजोबांना ग्रासलं होतं. न्युमोनिया फुप्फुसात गेल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी देण्याचं ठरलं. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून प्लाझ्मादाता वेळेत मिळाला. थेरपीनंतर 63 वर्षीय आजोबा आता ठणठणीत बरे झाले आहेत. आजोबांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. उपचारानंतर आज ते कुटुंबीयामध्ये सुखरूप परतले आहेत.

भोसरी गावठाणात राहणारे शेलार कुटुंबीय. वडील बंडोपंत गेणू शेलार यांना कोरोना कधी झाला ते समजलंच नाही. तीन वर्षांपूर्वी ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. वडिलांना कोरोना झाल्यानंतर आई शारदा शेलार यांनाही कोरोना झाला. त्यानंतर लहान भाऊ राकेश शेलार यांनाही संसर्ग झाला. त्यांना मोशी येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले होते. भाऊ व आई सात दिवसांत बरे झाले. मात्र, वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना प्लाझ्मा थेरपी देण्याचे वायसीएममधील डॉक्‍टरांनी ठरवले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोठा मुलगा दिनेश शेलार यांनी प्लाझ्मासाठी शोधाशोध सुरू केली. 13 जुलैला त्यांना वायसीएममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 15 जुलैला अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह प्लाझ्मा ग्रुपची गरज भासली. भोसरीतील तरुणांनी व मुलगा दिनशे शेलार यांनी प्लाझ्मासाठी विचारणा केल्यानंतर दाता मिळाला. खासगी हॉस्पिटलच्या गाडीवर चालक असलेल्या बबलू पिट्टे या तरुणाने प्लाझ्मासाठी तयारी दर्शविली. 18 जुलैपासून त्यांना प्लाझ्मा देण्यास सुरुवात केली. 22 जुलैला त्यांचा प्लाझ्माचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 30 ऑगस्टला त्यांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ते आता ठणठणीत बरे झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्लाझ्मादानासाठी तरुण पुढे येत आहेत. यापूर्वी दिवसाकाठी दोन ते तीन रुग्ण येत असे. सध्या ही संख्या चार ते पाच झाली आहे. आतापर्यंत 72 जणांनी प्लाझ्मा दान केल्याचे ब्लड बॅंकेचे डॉ. शंकर मोसलगी यांनी सांगितले.

प्लाझ्माची गरज ऐनवेळी केव्हा भासेल सांगता येत नाही. त्यासाठी सावध राहणे गरजेचे आहे. डॉक्‍टरांनी थेरपी दिल्यानंतर दाता वेळेतच मिळेल असं नाही. त्यासाठी धावपळ करावी लागते. त्यात एक ते दोन दिवस जातात. प्लाझ्मा घेतल्यानंतरही प्रक्रियेसाठी वेळ लागतो. या प्रक्रियेस उशीर झाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतण्याचीही शक्‍यता असते. सध्या वडिलांना थोडासा अशक्तपणा जाणवत आहे. मात्र, पूर्वीपेक्षा त्यांच्यात उत्साह वाढला आहे. इतरांना जीवदान देण्याकरिता दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिक प्रमाणात जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
- दिनेश शेलार, मुलगा, भोसरी गावठाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com