गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त जुनी सांगवीत शोभायात्रा

संस्कृती संवर्धन समिती,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी,बजरंग दल व समस्त ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत जयश्रीरामच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली
Gudi padwa Hindu New Year Old Sangvi yatra rss bjp Bajrang Dal
Gudi padwa Hindu New Year Old Sangvi yatra rss bjp Bajrang Dalsakal

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.संस्कृती संवर्धन समिती,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी,बजरंग दल व समस्त ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत जयश्रीरामच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली.कोरोनामुळे गेली दोन वर्षांनंतर प्रथमच यावर्षी परिसरातून सवाद्य बॅंड पथक, सजवलेल्या रथातून फुलांची आरास केलेली श्रीरामाची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

महिला,पुरूष,व लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेसह केशरी फेटे परिधान केले होते.सांगवी गावठाण येथील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा चौक, गजानन महाराज मंदिर रस्ता, शितोळे नगर, महाराष्ट्र बॅंक चौक ते सांगवी गावठाण या प्रमुख रस्त्यावरून ही शोभायात्रा काढण्यात आली. यात ग्रामस्थांसह उषा ढोरे,हर्षल ढोरे, जवाहर ढोरे,हिरेन सोनवणे,सोनम गोसावी,विशाल सांगळे,किशोर खोत,यांनी शोभायात्रेचे संचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com