esakal | काळ्या विंचवाचा दंश खूप भयानक असतो...त्याची लस पिंपरीत तयार होणार होती, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या विंचवाचा दंश खूप भयानक असतो...त्याची लस पिंपरीत तयार होणार होती, पण...
  • 'हाफकीन'ची काळ्या विंचवावरील लस लांबणीवर 
  • काही अपरिहार्य कारणांमुळे संशोधन बासनात 

काळ्या विंचवाचा दंश खूप भयानक असतो...त्याची लस पिंपरीत तयार होणार होती, पण...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : कोकणातील काळ्या विंचवाच्या दंशावरील प्रतिविष लसीची निर्मिती पिंपरी येथील हाफकीन जैवऔषधी निर्माण महामंडळाने हाती घेतली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे लसीचे संशोधन आणि निर्मिती महामंडळाला लांबणीवर टाकावी लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोकण भागांतील भातशेतीच्या पट्ट्यात काळ्या रंगाचे विंचू उन्हाळ्यात सापडतात. शेती करत असताना स्थानिक शेतकऱ्यांना त्याच्या दंश होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. पेरणी, कापणी किंवा मशागत करतेवेळी हे दंश होत असतात. त्याचे विष मानवी आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळेस त्याचे दंश होण्याचे प्रकार घडत असतात. लाल विंचू सर्वत्र सापडतो. मात्र, काळा विंचू केवळ प्रामुख्याने कोकणात आढळतो. काळा विंचू आकाराने थोडा मोठा असतो. दोन्हींमध्येही विषाचे प्रमाण सारखेच असते. त्यातही, लाल रंगाच्या विंचवाचे विष अधिक धोकादायक ठरते. दंशबाधित व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यास तो दगावण्याचीही शक्‍यता राहते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लस निर्मिती करण्याच्यादृष्टीने महामंडळाकडून संशोधनही सुरु करण्यात आले होते. काळे विंचू आणून त्याच्या विषाचे नमुने घेण्यात आले होते. त्याची चाचणी घेऊन वर्षभरात काळ्या रंगाच्या विंचवावर प्रतिविष लस तयार करण्यात येणार होती. परंतु, अजून त्याची निर्मिती सुरु झालेली नाही. त्यामागील नेमकी कारणे स्पष्ट होऊ शकली नाहीत. हाफकीन महामंडळात विषारी सापांवरील प्रतिविष लसींची निर्मिती केली जाते. त्यामध्ये मुख्यत्वे नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या प्रजातींच्या सापांचा समावेश आहे. तसेच लाल विंचवाच्या विषावरील प्रतिविष लसी देखील 1997 पासून तयार केल्या जात आहेत. त्यासाठी घोडे, खेचर यांचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वीच महामंडळाच्या प्रतिविष आणि रक्तजल विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


"काळ्या रंगाच्या विंचवाच्या विषावरील प्रतिबंधित लस तयार करण्यात येणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे लसीची निर्मिती लांबणीवर टाकावी लागली आहे.''
- डॉ. शिवाजी गाडे, व्यवस्थापक, हाफकीन जैव औषध निर्मिती महामंडळ, पिंपरी

loading image