पिंपळे निलखमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड; आई-वडिलांना दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीची छेडछाड करीत विनयभंग केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पिंपरी : रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीची छेडछाड करीत विनयभंग केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली. 

पोलिसांचा वचक संपला; आकुर्डीत भरदिवसा घरफोडी

रोहित ऊर्फ चाणक्‍य कैलास भांडे (रा. भांडेवाडा, शिवाजी चौक, पिंपळे निलख) व कार्तिक ऊर्फ दत्तात्रेय सावंत (रा. इंगवले चाळ, शिवाजी चौक, पिंपळे निलख) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली. रविवारी (ता. 4) सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी मुलगी पिंपळे निलख येथील एका रुग्णालयात जात होती. ती बसथांब्याजवळील रस्त्यावरून जात असताना आरोपी भांडे याने त्याची दुचाकी मुलीसमोर आडवी उभी करून मोबाईल क्रमांक मागितला. मात्र, मोबाईल क्रमांक न दिल्याने चिडलेल्या आरोपीने तिचा पाठलाग करीत मारून टाकण्याची धमकी दिली. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

त्यानंतर फिर्यादी मुलगी काही वेळाने रुग्णालयातून परत येत असताना आरोपींनी पुन्हा तिचा रस्ता अडवून फिर्यादीसह तिच्या आई-वडिलांना उचलून नेण्याची धमकी दिली. तसेच अश्‍लील शिवीगाळ करीत तरुणीचा विनयभंग केला. सांगवी पोलिसांनी याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harassment of girl in Pimple Nilakh