भोसरी, दिघी, इंद्रायणी भागातून पूरग्रस्तांना मदत

विविध संस्था, संघटनांकडून आर्थिक, किराणा साहित्याचे वाटप
pune
punesakal

भोसरी : अतिवृष्टीमुळे चिपळून, महाड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर आदी भागांसह इतरही काही भागात पूर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. काहींचे संसार उघड्यावर पडले. घरातील सर्वच साहित्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीत अखंड महाराष्ट्र पूरग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना जगण्याचे बळ दिले. भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आदी भागातील मदतीचा हात दिला आहे. (PCMC News)

भोसरी कला क्रीडा मंच

भोसरी कला क्रीडा मंचद्वारे स्थायीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी चिपळून पूरग्रस्तांसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश आमदार महेश लांडगे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमास दिला.

संत गाडगेबाबाअभियान

संत गाडगेबाबा अभियानाअंतर्गत महाडमधील भोराव, आसनपोळी, दीरवाडी, टाकाव, भीमनगर आदी भागातील सातशे कुटुंबांना किराणा, चादर, ब्लॅकेट, पाण्याच्या चार हजार वाटप साधना मेश्राम, मंदाकिनी गायकवाड, राजश्री जाधव, भीमाबाई तुळवे, मनीषा साळवे, प्रतिभा थोरात, वेणूबाई गायकवाड आदींना केले.

pune
पिंपरी-चिंचवड शहरात आज २१६ नवीन रुग्ण

इंद्रायणीनगर

इंद्रायणीनगरातील नागरिकांनी नगरसेविका नम्रता लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जमविण्यात आलेले किरणाचे १५१ किट, मिनरल वॉटरचे २०० बॉक्स, मॅगीचे १० बॉक्स, बिस्कीटचे २० बॉक्स, आटा ६० बॅग, तांदूळ ५ पोती, वह्या पेन्सिल रबर शार्पनरचे ३०० किट, साबण ३०० व इतर वस्तू आमदार लांडगे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमास दिले. नम्रता लोंढे, योगेश लोंढे, कौशल पब्बून, बिपीन मजगे, भरत सोनी, खेतारामशेठ विष्णोई, कुलदीप सिंग, दिलीप गुप्ता, सुशील गुप्ता, असद खान, मंगेश तळेकर, प्रताप सिंग, आदींचे सहकार्य लाभले.

दिघी विकास मंच

दिघी विकास मंचद्वारे चिपळून येथील शंकरवाडी, अडरे या गावातील नागरिकांना अन्नधान्य, महिलानां कपडे, जीवनावश्यक वस्तू आदींचे वाटप केले. अडरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली पिपंरे यांनी मदत कार्याचे आभार मानत प्रमाणत्रक दिले. साहित्याचे वाटप मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, सुनील काकडे, दत्ता घुले, धनंजय खाडे, किशोर गुरव, मनोज नांगरे, आकाश शिंदे, दत्ता माळी आदींनी केली.

शिवसेना भोसरी शाखा

चिपळून व महाड येथील नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंच्या कीटचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अॅड. राहुल गवळी, दिघी शाखाप्रमुख किशोर सवई, प्रशांत तरटे आदींनी केले. गवळीनगर प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांनीही योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com