'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचा प्रश्‍न मार्गी लावा', अजित पवारांनी दिल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

  • भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ करण्याचे दिले आदेश 

पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. या प्रकल्पासाठी महत्त्वाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. मेट्रो कार डेपो व कास्टिंग यार्डचे भूसंपादन प्रलंबित आहे. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे, मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांच्यासोबत अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक गुरुवारी (ता. 24) घेण्यात आली. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' विषयावरून भाजप-शिवसेनेत रंगतोय सामना

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हिंजवडी-शिवाजीनगर प्रकल्प विकसित होणार आहे. टाटा कंपनीसोबत करार होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतरही आवश्‍यक तेवढ्या जागा टाटा कंपनीच्या ताब्यात गेलेल्या नाहीत. माण येथील जागेबाबतही स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी न्यायायालयात दाद मागितली आहे. माणची 15 हेक्‍टर जागा कारशेडसाठी गरजेची आहे. यातील साडेसात हेक्‍टर जागा ताब्यात आलेली आहे. वाकड येथील 15 हेक्‍टर जागा कास्टिंग यार्डसाठी गरजेची आहे. ती जागाही अद्यापपर्यंत ताब्यात मिळालेली नाही. केंद्र व राज्य सरकारकडे या शासकीय जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

'रेमडेसिव्हिर'ची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

मेट्रोसाठी 24.76 हेक्‍टर जागेची गरज आहे. कार डेपो, कास्टिंग यार्ड, मेट्रोचे 23 स्टेशन, मेट्रोच जिने याकरिता पीएमआरडीएला पुरेशी जागा हवी आहे. आतापर्यंत केवळ कार डेपोसाठी साडेसात हेक्‍टर ताब्यात आली आहे. तसेच, इतर व्यावसायिक वापरासाठी 4.75 हेक्‍टर जागा मिळाली आहे. मेट्रो उभारणीसाठी राज्य सरकारच्या हिश्‍श्‍याच्या व्यवहार्यता तफावत निधीनुसार मिळालेल्या शासकीय तंत्रनिकेतन, दुग्ध विकास व पोलिस विभाग या तीन विभागांकडील एकूण 21 हेक्‍टर 71 आर. शासकीय जागांच्या कागदोपत्री प्रक्रियेची विचारणाही बैठकीत करण्यात आली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinjewadi-Shivajinagar Metro was reviewed by Deputy Chief Minister Ajit Pawar