Sakal Vastu Expo 2022
Sakal Vastu Expo 2022Sakal

सकाळ एक्स्पोमध्ये करा घराचा संकल्प

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे शनिवार व रविवारी आयोजन

पिंपरी : कोरोनाच्या काळात हक्काच्या घराची उणीव अनेकांना भासली. तसेच कुटुंबातील सदस्य लक्षात घेऊन अनेकांनी मोठ्या घरांचा संकल्प मांडला. या सर्वांच्या इच्छापूर्तीसाठी व सणांच्या पार्श्वभूमीवर स्वप्नातील हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२२’च्या माध्यमातून चालून येते आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे वीकेंडला सलग दोन दिवस प्रदर्शन भरणार आहे. त्यात आपल्याला हवे तसे, आपल्या बजेटमधील किमतीत, हवे तेवढ्या मोठ्या घरांचे असंख्य पर्याय उपलब्ध असतील.

पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीएचा मोठा भाग आता गतीने विकासाच्या टप्प्यात येतो आहे. या प्रक्रियेत शहराच्या सभोवतालच्या गावांमध्येही विकासाची प्रक्रिया पोहचत आहे. तिथे मनाजोगे, आवाक्यातील व आपल्याला भावतील असे अनेक गृहप्रकल्प आकाराला येत आहेत. या विकास प्रक्रियेत आपण योग्य वेळी गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरणार, हे देखील तितकेच खरे आहे. सध्या अनेकांना घरांची वाढती गरज लक्षात येत आहे. शिवाय, राज्य शासनाने मुद्रांक शुल्क व इतर गोष्टीमध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रकल्पातील तयार घरांची विक्री झाली आहे. घरांची वाढती मागणी, दिवसागणिक वाढत जाणाऱ्या घरांच्या किंमती लक्षात घेता, हा सध्याचा काळ घरखरेदीसाठी सर्वात योग्य असल्याचे रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ घर खरेदीदारांसाठी पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात एकाच छताखाली ५० हून अधिक नामांकित बांधकाम व्यावसायिक कंपन्यांचे दोनशेहून अधिक गृह व व्यावसायिक प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. तसेच घरखरेदीदारांसाठी २५ लाखांपासून ते एक कोटी रुपये किंमती दरम्यानच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील, त्यांची माहिती एक्स्पोमधून मिळणार आहे.

एस. लक्ष्मीनारायणन

सकाळ वास्तू एक्स्पोमध्ये ड्रिम्स डेव्हलपचे संस्थापक एस. लक्ष्मीनारायणन यांचे ‘पुनर्विकास’ विषयावर विशेष व्याख्यान शनिवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ‘पुनर्विकास का?’, संबंधित नियम, व्यावसायिक कसे निवडायचे, सोसायटी कशी तयार करावी?, पाकदर्शन व्यवहार्यता अहवाल, अहवालांचे फायदे आणि तोटे, विविध करार आदींबाबतच्या शंकांचे निरसनही या वेळी होणार आहे.

आनंद पिंपळकर

प्रख्यात वास्तूतज्ज्ञ व ज्योतिर्विद्या पारंगत आनंद पिंपळकर यांचे ‘वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र’ विषयावर रविवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होणार आहे. वास्तुशास्त्र काय आहे? त्याचे नियम फ्लॅटला लागू पडतात का? फ्लॅट सिस्टिममध्ये एकसारख्याच वास्तू असताना प्रत्येकाला त्याचे परिणाम वेगवेगळे का जाणवतात, विना तोडफोड फ्लॅटमधील वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे करता येते का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com