
दुकानासमोरील कुल्फीच्या गाडीजवळ येऊन त्याने लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तो लॉटरीच्या दुकानात शिरला. 'ए चल पैसे दे, नाहीतर एकेकाला मारून टाकीन' अशी धमकी दिली.
पिंपरी Pimpri News Pune News : "मी इथला डॉन आहे, मी आलो की मला पैसे द्यायचे, नाहीतर मारून टाकीन' अशी धमकी देत लॉटरी सेंटरमधील कामगारांना मारहाण करीत रोकड लुटली. कोयता भिरकावून तेथील लोकांना शिवीगाळ करीत परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली. दिनेश मनोहर खरात (वय 22, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत विशाल उद्धव गडकर (वय 22, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता.2) सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी हे मोरेवस्तीतील साने चौक येथील लॉटरी सेंटरमध्ये काम करीत असताना आरोपी हातात कोयता घेऊन लॉटरीच्या दुकानासमोर आला. दुकानासमोरील कुल्फीच्या गाडीजवळ येऊन त्याने लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तो लॉटरीच्या दुकानात शिरला. 'ए चल पैसे दे, नाहीतर एकेकाला मारून टाकीन' अशी धमकी दिली. दुकानातील काउंटरमधून दोन हजार 300 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. "तुमच्या मालकाला पण सांगा. मी आलो की मला पैसे द्यायचे. नाहीतर तुमच्या मालकाला पण मारून टाकील' अशी धमकी देत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या कामगारांना मारहाण केली. "मी इथला डॉन आहे, पोलिसात तक्रार दिली तर, तुमचे हात-पाय तोडीन' अशी धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा