जुनी सांगवीत गॅस गळतीमुळे घराला आग अन्...

जुनी सांगवीत गॅस गळतीमुळे घराला आग अन्...

जुनी सांगवी : येथील अभिनवनगरमधील नंदकुमार जोशी यांच्या घरी सिलिंडरमधून गँस गळती झाल्याने घराला आग लागली. या घटनेत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तसेच, नंदकुमार यांच्या पत्नी किरकोळ भाजल्याने त्यांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

गँस गळतीमुळे लागलेल्या आगीने किचनमध्ये शॉर्टसर्किट झाला. यामुळे आग संपूर्ण घरात पसरली. या घटनेची माहिती कळताच नगरसेवक हर्षल ढोरे यांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांनी पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास माहिती दिली. तत्पूर्वी स्थानिक नागरिक शरद कोकाटे, प्रमोद शिंदे आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिनवनगर येथील स्थानिक नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीबाबतही चौकशी करण्यात आली. दरम्यान, जोशी कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे हर्षल ढोरे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com