पोटगीच्या पैशांसाठी पत्नीने दिला वारंवार त्रास; अखेर पतीने उचलले मोठे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.

पिंपरी : पैशांसाठी पत्नीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मारूंजी येथे घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अभिजीत गणेश खर्डे (वय 38, रा. रिपब्लिक सोसायटी, मारूंजी, ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील गणेश नथूजी खर्डे (वय 65, रा. हॅपी होम कॉलनी, नाशिक) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अभिजीत यांची पत्नी नेहा खर्डे (वय 35), तिचा मामा विश्‍वास जोशी, वडील नितीन बकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत यांच्याकडून छळ होत असल्याप्रकरणी व पोटगी मिळावी म्हणून पत्नी नेहा हिने काही दिवसांपूर्वी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये त्यांच्यात समझोता होऊन पन्नास लाख रुपये दिल्यानंतर सर्व गुन्हे मागे घेण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे वीस लाख रुपये फिर्यादी व त्यांचा मुलगा अभिजीत यांनी सून नेहा हिला दिले होते. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी आरोपी हे अभिजीत यांना वारंवार मानसिक त्रास देत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या त्रासाला कंटाळून अभिजीत यांनी शनिवारी (ता. 31) राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींकडून होत असलेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide due to wife's troubles at marunji

Tags
टॉपिकस