घरखर्चावरून पती-पत्नीत किरकोळ भांडण झालं, अन् पतीने 'हे' पाऊल उचललं

घरखर्चावरून पती-पत्नीत किरकोळ भांडण झालं, अन् पतीने 'हे' पाऊल उचललं

पिंपरी  :  घरखर्चाला पत्नीने पैसे मागितल्याने झालेल्या किरकोळ भांडणातून पेंटरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. २४) रात्री भोसरी येथे घडली. प्रवीण गुलाबराव शेलार (वय ४२, रा. संत तुकारामनगर, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. प्रवीण हे रंगकाम करतात.

लॉकडाउनमुळे प्रवीण यांच्याकडे कोणतेच काम नव्हते. रविवारी
 रात्री पत्नीने प्रवीण यांच्याकडे घरखर्चाला पैसे मागितले. त्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. वादानंतर प्रवीण यांच्या पत्नी शेजारी राहणाऱ्या आपल्या जावेकडे गेल्या. त्यावेळी प्रवीण यांची दोन्ही मुले बाहेर अंगणात खेळत होती. प्रवीणने दरवाजा लावून घेतल्याचा आवाज ऐकून पत्नी घरी आली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पत्नीने दरवाजा वाजवला. मात्र, आतून प्रवीणने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रवीणचा भाऊ आणि शेजारी जमा झाले. पत्नीने खिडकीची काच फोडली असता प्रवीण यांनी गळफास घेतल्याचे दिसले. यामुळे नागरिकांनी तत्काळ दरवाजा तोडून प्रवीण यांना खाली उतरवले. प्रवीण यांना पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भोसरी पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com