महिलांना प्रगतीचा केंद्रबिंदू मानला तर विकास नक्कीच - शबाना आझमी

Shabana-Azami
Shabana-Azami

पुणे लोणावळा - महिलांना जर प्रगतीचा केंद्रबिंदू मानला तर नक्कीच विकास कामांना आणखी गती येईल असे मत जेष्ठ अभिनेत्री व माजी खासदार शबाना आझमी यांनी लोणावळ्यातील केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कैलासनागर अनौपचारिकरित्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, तन्वी आझमी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने  करण्यात आलेल्या कोविड-१९ अंतर्गत उपाययोजना, नगरपरिषदेच्या रस्ता सुशोभीकरण, परिसर स्वच्छता व आरोग्यविषयक कामांची यावेळी माहिती देण्यात आली.  नगराध्यक्षा सुरेख जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार आदींसह  नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com