दिलासादायक : देहू-महामार्गाची तातडीने दुरुस्ती

मुकुंद परंडवाल
Tuesday, 15 December 2020

पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डे रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. 16) तातडीने बुजविले.

देहू : पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डे रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. 16) तातडीने बुजविले.

हे ही वाचा : औषध फवारणीचा कृषी विभागाचा सल्ला

यासंदर्भात देहूरोड शहर राष्ट्रवादी कॅाग्रेसने येत्या 19 डिसेंबरला सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर टोल वसूली करण्यात येते.मात्र देहूरोड ते निगडी दरम्यान आजही अनेक समस्या आहेत.

त्यापैकी देहूरोड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी होते. त्याचप्रमाणे देहूरोड शहरातील गुरुव्दारा ते स्वामी विवेकानंद चौक दरम्यान रस्त्यावरही खड्डे आहेत. याचा स्थानिक नागरिकांना त्रास होतो. बाजारपेठेत येताना या मार्गावर वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर देहूरोड शहर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, यदुनाथ डाखोरे, रेणू रेड्डी, गणेश कोळी, बाळासाहेब जाधव, अॅन्थनी स्वामी यांनी तळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक, रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांना धडक मोर्चा करण्याचे निवेदन दिले.

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याची दखल घेत तातडीने रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी उड्डाणपुलावरील खड्डे बुजविले. तसेच येत्या दोन दिवसांत गुरुद्वारा ते स्वामी विवेकानंद चौकातील खड्डे बुजविणार आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immediate repair of dehu highway