पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालवायची असेल, तर हे करावं लागेल...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

- या निर्णयामुळे काही चालकांची उपासमार थांबणार आहे.

पिंपरी : नॉन रेडझोनमध्ये रिक्षा चालवायची आहे का? मग चालक व प्रवासी सुरक्षेचे काय? थांबा, त्यासाठी चालकांच्या सीटमागे सुरक्षा पडदा लावण्यात येणार आहे. या अटी शर्तीच्या आधारावर शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे काही चालकांची उपासमार थांबणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे 20 हजार रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद आहे. पण आता शहराला रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलिस आयुक्त नीलिमा जाधव, पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद सगरे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर आणि रिक्षा संघटना पदाधिकारी यांच्यात गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांच्या सीटमध्ये प्लॅस्टिक ट्रान्स्फर असलेला पडदा लावणे आवश्‍यक आहे. रिक्षात सॅनिटायझर आणि इतर सुरक्षा साधने बाळगणे आवश्‍यक असल्याचे चर्चेत निष्पन्न झाले. कारण तीन महिन्यांपासून रिक्षा बंद असल्यामुळे चालक आर्थिक पेचात सापडला आहे. त्यामुळे याबाबत सुरक्षा पडदा कसा असावा. ऊन, वारा, पाऊस तसेच सुरक्षा पडदा फाटण्यात येऊ नये अथवा त्याचे नुकसान कोणी करू नये, या बाबत गेल्या दोन दिवसांपासून पोलिस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे हे वेगवेगळ्या रिक्षांना वेगवेगळ्या स्वरूपात सुरक्षा पडदे लावून पाहणी करत आहेत. अनेक रिक्षांची पाहणी झाल्यानंतर रिक्षाला सुटसुटीत रोज काढता बसवता येईल, असा पडदा बसविण्याबाबत एकमत झाल्याचे गोकुळे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रिक्षा चालकांच्या अडचणी समजून घेत सशर्त परवानगी देण्याबरोबरच रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षा बाबत काळजी घेत मदत आणि सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आता लवकरच रिक्षा व्यवसाय पूर्वपदावर येणार आहे.

- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news about rickshaw drivers in Pimpri Chinchwad