पिंपरी-चिंचवड : मिळकतकर अभय योजनेला मिळाली मुदतवाढ

पिंपरी-चिंचवड : मिळकतकर अभय योजनेला मिळाली मुदतवाढ

पिंपरी : थकबाकीसह मिळकतकर भरणा करण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे, आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी सांगितले. 

अवैध बांधकामाची शास्तीची (दंड) रक्कम वगळून थकबाकीसह मिळकतकराची एकरकमी शंभर टक्के रक्कम भरणाऱ्यास अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार, विलंब दंड रकमेच्या ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. थकबाकीसह मिळकतकर भरणा करण्यासाठी अभय योजनेची मुदत रविवारपर्यंत होती. ती आता ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com