वाचन संस्कृती रुजविण्यासाठी 'एक पान प्रतिभेचं' 

मुकुंद परंडवाल
Friday, 2 October 2020

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'एक पान प्रतिभेचं' हा अभिवाचन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

देहू : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालय समितीतर्फे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'एक पान प्रतिभेचं' हा अभिवाचन उपक्रम शुक्रवारपासून (ता. 2) सुरू करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपक्रमाबाबत विद्यालयाचे प्राचार्य सुनिल लाडके म्हणाले, की सध्याच्या काळात ग्रंथालयात येणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. या उपक्रमामुळे सर्वांनाच वाचनाची आवड निर्माण होईल. तसेच, आपण काय वाचले. त्यातून समाजाला काय द्यावे, समाजाने काय घ्यावे, याचाही चांगला संदेश विद्यार्थी यु ट्यूबच्या माध्यमातून देऊ शकेल. या उपक्रमात आपण वाचलेल्या एका चांगल्या पुस्तकातील एक पान बहारदार वाचायचे आहे. ते पान वाचताना त्याचा व्हिडिओ काढून पाठवायचा आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या उपक्रमामुळे वाचन संस्कृती वाढेल, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल, विद्यार्थ्यांना साहित्यिकांचा परिचय होईल, विद्यार्थ्यांमधून प्रतिभावान साहित्यिक निर्माण होईल, आजी माजी विद्यार्थी आणि पालकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महात्मा गांधी जयंतीपासून सुरू केला आहे. pratibhe che ek paan shri mhalsakant vidyalaya या यू ट्युबवर पाठवू शकता. विद्यालयाचे उपप्राचार्य के. डी. गायकर, ग्रंथपाल मनिषा साठे, संजय गिराम, आम. आर. रोकडे, एम. जे. पुंडे आणि ग्रंथालय समितीने संयोजन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inculcate reading culture ek paan pratibhache advocacy program started on youtube