गहुंजे स्टेडियमवर दुर्बिणीच्या मदतीने क्रिकेट बेटिंग; 33 जणांना अटक

india vs england cricket gahunje stadium betting 33 arrested
india vs england cricket gahunje stadium betting 33 arrested

पिंपरी : भारत व  इंग्लड क्रिकेट सामन्यावर दुर्बिणीच्या सहाय्याने बेटिंग घेणाऱ्या टोळीवर वाकड पोलिसांनी कारवाई केली. एकाच वेळी तीन ठिकाणी केलेल्या या कारवाईत ३३ सट्टेबाजांना अटक केली. हे सट्टेबाज गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत व इंग्लंड एकदिवसीय वन डे क्रिकेट सामन्याचे घोराडेश्वर डोंगरावरून दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून त्या माहितीच्या आधारे सट्टा घेत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी मामुर्डी गावातील एका इमारतीच्या छतावरून, घोराडेश्वर डोंगरावरून आणि चंदननगर येथे छापा टाकला. यामध्ये मध्यप्रदेश (४), हरियाणा (१३) महाराष्ट्र (११) राजस्थान (३) गोवा (१) आणि उत्तर प्रदेश (१) येथून बेटिंगसाठी आलेल्या एकूण ३३ जणांना अटक केली. हे आरोपी भोपाळ व नागपूर येथील दोघांच्या संपर्कात राहून त्यांना या सामन्याची माहिती देत होते. त्यानुसार ऑनलाइन प्रक्षेपण आणि दुर्बिणीद्वारे सट्टा लावत होते. या कारवाईत पोलिसांनी ७४ मोबाईल, तीन लॅपटॉप आणि एक लाख २६ हजार ४३० रोख रक्कम आणि २८ हजारांचे परकीय चलन असा एकूण ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा पोलिसांनी जप्त केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी- चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com