उद्योग मंत्र्यांची आयटी पार्क हिंजवडीत गुफ्तगू

एमआयडीसी अधिकारयांसमवेत गुप्त बैठक
Subhash-Desai
Subhash-Desaisakal

वाकड : राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची सोमवारी (ता. ४) दुपारी आयटी पार्क हिंजवडी येथील इंडस्ट्रीयल असोशियशनच्या कार्यालयात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. मात्र ही बैठक अत्यंत गोपनिय पद्धतीने झाली. विशेष म्हणजे या बैठकीबाबत आयटीनगरी हिंजवडी-माणच्या गावकरभाऱ्यांना आणि माध्यम प्रतिनिधींना मागमूसही नव्हता. त्यामुळे या गुप्त बैठकीमागिल गौडबंगाल समजू शकले नाही कमालीची गुप्तता बाळगुन पार पडलेल्या या बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, एचआयएच्या सदस्यांसह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या लवाजमा उपस्थित होता.

हिंजवडीतील मूलभूत सुविधा, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए व महापालिका या संस्थाकडील प्रलंबित प्रश्न, बारगळलेली विकास कामे, रखडलेले पर्यायी रस्ते, मेट्रो याबाबत मंत्री महोदयांनी थोडक्यात आढावा घेतला मात्र प्रत्यक्षात शिवसेना पदाधिकाऱ्यांची ही बैठक असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. गेल्या अनेक वर्षांत आयटी पार्क हिंजवडीत मंत्री, आमदार, खासदार यांनी येथील स्थिती जाणून घेण्यासाठी बैठका घेतल्या आहेत मात्र त्यांनी स्थानिक गाव कारभारी, पदाधिकारी व विविध प्रशासकीय यंत्रणांच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधून बैठका घेतल्या आहेत. ह्या गुप्त बैठकीबाबात माहिती मिळताच धावत पळत आलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींना बाहेरच रोखण्यात आले तर मंत्री देसाई यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हिंजवडीच्या सरपंचांनी देखील ऐन वेळी धाव घेत मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com