वडगाव मावळ : महाविकास आघाडीच्या नगरसेवकांसह भाजपनेही केलीय 'ही' मागणी

वडगाव मावळ : महाविकास आघाडीच्या नगरसेवकांसह भाजपनेही केलीय 'ही' मागणी

वडगाव मावळ (पुणे) : वडगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे केली आहे.

वडगाव नगरपंचायत परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नगरपंचायतीच्या विविध विभागातील कर्मचारी जोखीम पत्करून आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. दुर्दैवाने कोरोनामुळे एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी प्रशासनाने खंबीरपणे उभे राहायला हावे. त्यासाठी नगरपंचायतीतील कर्मचार्‍यांना ५० लाखांचा विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी उपनगराध्यक्षा माया चव्हाण, गटनेते राजेंद्र कुडे, गटनेत्या प्रमिला बाफना, सुनिल ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, शारदा ढोरे, पुनम जाधव, पुजा वहिले, सायली म्हाळसकर आदींनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचीही मागणी...

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांप्रमाणेच भाजपच्या नगरसेवकांनीही वडगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांनी या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com