बायडेन यांना पिंपरी-चिंचवडमधून शुभेच्छा; पोलिस आयुक्तांनी शेअर केला फोटो

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

जो बायडेन यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. 

US Election 2020 : पिंपरी : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पिंपरी-चिंचवडमधून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या शुभेच्छा दिल्या असून त्यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा फोटोही त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. 

जो बायडेन यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवून रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. बायडेन यांनी 2009 ते 2017 या कालावधीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून देखील अमेरिकची धुरा सांभाळली आहे. जो बायडेन यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. 

...आणि दररोजच्या ताणतणावातही पोलिसांतील कलाकारांचा लागला सूर!​

दरम्यान, जो बायडेन अमेरिकचे उपराष्ट्राध्यक्ष असताना 2013 मध्ये मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी कृष्ण प्रकाश हे साउथ मुंबई विभागात अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते. बायडेन यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. बायडेन यांच्या दौऱ्यात मुंबई पोलिसांनी उत्तम सुरक्षा पुरवली. त्यानंतर बायडेन यांनी प्रकाश यांना बोलावून सर्व पोलिसांचे आभार मानले. तसेच प्रकाश यांना हस्तांदोलन करत कौतुकाची थाप दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS Krishna Prakash shared photo with newly elected US President Joe Biden