आयटीयन्स तरुणाईचा तंदुरुस्त राहण्याचा फिटनेस फंडा; काय आहे पहा

लोणावळा : सायकलफेरीचा आनंद लुटणारे तरुण.
लोणावळा : सायकलफेरीचा आनंद लुटणारे तरुण.

पिंपरी - गेल्या चार महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. घरात बसून अस्वस्थ वाटत होते. जीम बंद आहेत. व्यायाम नसल्याने वजन आवाक्‍याच्या बाहेर कधी गेले लक्षात ही आले नाही. उद्यानेही बंद होती. मग मी सोलो सायकल चालविण्याचा निश्‍चय केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठवड्यातून दोन दिवस सत्तर किलोमीटरहून अधिक सायकल चालवतो. सुरुवातीला हातपाय दुखू लागले. नंतर सवयीचा भाग होऊन गेला. शरीर तंदुरुस्त झाले. वजनही आटोक्‍यात आले आहे. सध्या बारा जणांचा ‘पेडल वॉरिअर्स ग्रुप’ तयार झाला आहे. सर्वांचा उत्साह वाढल्याने सायकलिंगला हुरूप आल्याचा अनुभव सांगत होता कासारवाडीतील ३४ वर्षीय आयटीयन्स अतुल दौंडकर.

सध्या लोणावळा, मावळ, कामशेत, मुळशी, खडकवासला, आळंदी, देहू, चांदणी चौक, दिवे घाट, शिरगाव, भोर या ठिकाणांना तरुण-तरुणींनी सायकलिंगसाठी सर्वाधिक भर दिला आहे. कोरोनामुळे आरोग्यासाठी सायकल व्यायामालाच तरुणांनी पसंती दिली आहे. सर्व तरुणांनी व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये चर्चा करून लोकेशन ठरते. घरातून सकाळी पाच ते साडेपाच सर्वजण बाहेर पडतात.

शनिवार व रविवारचा दिवस शक्‍यतो निवडला जातो. सुरक्षेसाठी फायबरचे सायकल हेल्मेट, पावसाळी शूज, सोबत पाण्याची बाटली बाळगतो. एक दिवस आधी सायकलचे टायर तपासून हवेचा दाब पाहिला जातो. सायकल वाटेत खराब होऊ नये यासाठी मध्यम स्वरूपाच्या हायब्रीड सायकलला तरुणांनी पसंती दिली आहे. या सायकलींची देखभाल दुरुस्ती त्रासदायक नसते. यात बरेच जण हायब्रीड, एमटीव्ही, माऊंटन सायकलचाही वापर करीत आहेत. काहीजण महागड्या इलेक्‍ट्रिक रोड बाइकचीही विचारणा करीत आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वंचितचे डफली बजाओ आंदोलन
   
सायकल ट्रॅक हवा
व्यायामासाठी ट्रॅक चांगले हवेत. रस्ते देखील खराब आहेत. त्यामुळे थोडाफार त्रास होतो. लुप्त झालेले ट्रॅक पुन्हा चांगले व्हावेत ही मागणी जोर धरू लागली आहे. 

तरुणांची सायकलला ५० टक्‍क्‍यांहून अधिक मागणी आहे. यामध्ये सर्वाधिक आयटीयन्स आहेत. तीन महिन्यांत दररोज २० ते ३० सायकलींचे बुकिंग होत आहे. पाच ते वीस हजारांच्या सायकलींना मागणी आहे.
- धनाजी साळुंके, सायकल व्यावसायिक, पिंपरी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com