पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो हॉस्पिटल राहणार सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

रुग्णसंख्या घटल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पिंपरी-नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटल सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालयांतील रुग्ण स्थलांतरित केले आहेत. वायसीएम रुग्णालय पूर्णतः नॉन कोविड रुग्णांसाठी तर, भोसरी रुग्णालय इंग्लंडहून आलेले व पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे.

पुण्यातील हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय; वायसीएम नॉन कोविड रुग्णालय 
पिंपरी - रुग्णसंख्या घटल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पिंपरी-नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटल सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालयांतील रुग्ण स्थलांतरित केले आहेत. वायसीएम रुग्णालय पूर्णतः नॉन कोविड रुग्णांसाठी तर, भोसरी रुग्णालय इंग्लंडहून आलेले व पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयुक्त कोण?

राज्य सरकार, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन व महापालिका यांच्यातर्फे नेहरूनगर येथे जम्बो हॉस्पिटल सुरू आहे. त्याच जोडीला महापालिकेने स्वखर्चातून ऑटो क्‍लस्टर येथेही जम्बो फॅसिलिटी रुग्णालय सुरू केले आहे. हे दोन्ही रुग्णालये सुरूच राहणार आहेत. शहरात अन्य साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने व नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे वायसीएम हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णालय केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर तेथून शहरात आलेल्या प्रवाशांची तपासणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यातील 215 पैकी दोन प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशा रुग्णांसाठी नवीन भोसरी रुग्णालय राखीव ठेवले आहे. तेथील 18 रुग्ण आठ दिवसांपूर्वीच जम्बो रुग्णालयात स्थलांतरित केले आहेत. इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाइनची व्यवस्था वाकड येथील दोन हॉटेल्समध्ये केली आहे. त्याचा खर्च प्रवाशांना स्वतः करायचा आहे. 

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

मोफत उपचार सुविधा 
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजार सहाशे बेडची दोन जम्बो कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यात पुण्यातील जम्बोतील उपचार बंद केले, तरी पिंपरी-चिंचवडमधील जम्बोत रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. हे सेंटर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत उपचारासाठी या सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Hospital Pimpri Chinchwad will continue