'जनता कर्फ्यू' पाळण्यात सांगवीकरांचा आदर्श घेण्यासारखा... 

'जनता कर्फ्यू' पाळण्यात सांगवीकरांचा आदर्श घेण्यासारखा... 

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुकारलेल्या जनता कर्फ्यूला जुनी सांगवी व दापोडीकरांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. तसेच, ढगाळ वातावरणामुळे नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.

दोन दिवसांपूर्वी या भागात मास्क न घालता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या जवळपास पन्नास जणांवर आरोग्य विभाग व पोलिस पथक यांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली होती. याचाही परिणाम जाणवत असून, आरोग्य पथक व पोलिसांनी पुन्हा अशा बेजबाबदार व्यक्तींना पायबंद घालवा, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यावर सांगवी, दापोडी परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. ती रोखण्यासाठी अत्यावश्यक कामे वगळता मोकाट फिरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई अपेक्षित होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने प्रादुर्भाव वाढल्याचे नागरिकांमधून बोलले जाते. कारवाईत सातत्य ठेवून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, गुरुवारी (ता. ९) जुनी सांगवी व दापोडीकरांनी बाजारपेठा, भाजीविक्री व इतर सर्व दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळला. तसेच, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी,  सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते.

नवी सांगवीतही चांगला प्रतिसाद...

नवी सांगवी : नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील बहुतेक सर्व दुकाने बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. परंतु, असे असले तरी रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात चालू होती. येथील कृष्णा चौकात भाजीपाला विकणारे पथारीवाले व हात गाडीवाले यांची नेहमीच गर्दी असते. अतिक्रमण विभागाने अनेक वेळा त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली आहे. परंतु, कारवाई झाल्यानंतर पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती होती. दरम्यान, आज कृष्णा चौकाने पूर्णपणे मोकळा श्वास घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com