...म्हणून आव्हानांचा सामना करण्याचे धाडस

चिंचवड : जिम ट्रेनर ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी आपल्या पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर त्यांना सॅल्यूट करताना अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे.
चिंचवड : जिम ट्रेनर ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी आपल्या पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर त्यांना सॅल्यूट करताना अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे.

पिंपरी - ‘आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीही मला सोडून गेले. अंध:कारमय आयुष्य जगत असताना कधीकधी टोकाचा विचारही मनात घोंघावत होता. त्यातून सावरत मार्गक्रमण करीत राहिले. अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना केला व करीत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे आव्हानांशी, संकटांशी लढण्यासाठी आणखी बळ मिळाले. जगण्याची दिशा मिळाली. समाजात वावरण्यासाठी आणखी धाडस आले,’’ अशी भावना एक दिवसासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त बनलेल्या ज्योती माने यांनी व्यक्त केल्या. 

कृष्ण प्रकाश यांनी २६ जानेवारीनिमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलिस अधिकारी बनविण्याचा उपक्रम राबविला. त्यात भोसरीतील ज्योती माने यांना एक दिवसाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त बनविण्यात आले होते. यानिमित्त ‘सकाळ’शी त्या बोलत होत्या. जामखेड (ता. नगर) मूळगाव असलेल्या माने यांचे आई-वडील अनेक वर्षांपासून पिंपरीत वास्तव्यास होते. भोसरी हे त्यांचे सासर आहे. पतीसमवेत भोसरीत राहत असताना त्यांनी व्यायामशाळा सुरू केली. दरम्यान, पतीचे निधन झाले. मुलीसह कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिकण्याची जिद्द असल्याने लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले. न डगमगता त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले.

माने म्हणाल्या, ‘आई व पती हे दोन मुख्य आधार गेल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतरही आव्हानांचा सामना करीत जीवनप्रवास सुरू आहे. मुलीची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावरच आहे. स्त्रीला बोलण्याचा अधिकार नसतो.  नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र, या उपक्रमामुळे मनमोकळेपणाने बोलता आले.

पोलिस आयुक्तांनी आम्हाला तो अधिकार प्रदान केला. एका दिवसासाठी त्यांची जागा आम्हाला दिली हा त्यांचा मोठेपणा आहे. यामुळे जगण्याची दिशा मिळाली. समाजात वावरण्यासाठी आणखी धाडस आले. आतापर्यंत जीवन नकारात्मकच वाटत होते. मात्र, या प्रसंगातून माझ्यासोबत काही तरी चांगले घडले व येथून पुढेही चांगले घडेल असे मनोमन वाटत आहे. जीवनातील नकारात्मता दूर झाली. हा प्रसंग माझ्यासाठी आश्‍चर्यकारक होता.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘असा प्रसंग चित्रपटातच पाहत आले’
या अगोदर असा प्रसंग केवळ चित्रपटातच पाहत आले. पोलिस व नागरिकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्तांनी या उपक्रमाद्वारे केला. हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आता मला माझा स्वत:चाच अभिमान वाटत असल्याचेही माने यांनी नमूद केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com