खेडमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या चिखली पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

खेडमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या चिखली पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

पिंपरी : खेडमधील दुहेरी हत्याकांडातील फरारी दोन आरोपींना चिखली पोलिसांनी जेरबंद केले आहे. चिंचवड बसस्थानकाजवळून या आरोपींना ताब्यात घेऊन खेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सूरज प्रकाश रणदिवे (रा. नंदनवन हौसिंग सोसायटी घरकुल, चिखली, पुणे), किरण चंद्रकांत बेळामगी (रा. निलरत्न हौसिंग सोसायटी घरकुल, चिखली, पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. 

मागील आठवड्यात खेडमधील शिरोली येथे दोघांचा खून झाला होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह झाडाझुडपात आढळला. दरम्यान, या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरारी असलेले आरोपी चिंचवड येथील बसस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून रणदिवे व बेळामगी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. चिखली पोलिसांनी या आरोपींना पुढील तपासासाठी खेड पोलिसांच्या स्वाधीन केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही कारवाई चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, कर्मचारी विश्वास नाणेकर, चेतन सावंत, विपुल होले, बाबा गर्जे, संतोष सपकाळ, कबीर पिंजारी, सचिन नलावडे यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com