
Kishor Aware Murder Case : आवारे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना २० मे पर्यंत पोलिस कोठडी
पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या शुक्रवारी (ता.१२) दुपारी झालेल्या निघृण हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शनिवारी (ता.१४) रात्री उशिरापर्यंत मुख्य सूत्रधारासह एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.सहाही आरोपींना वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने येत्या २० मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
श्याम अरुण निगडकर (४६,डोळसनाथ आळी तळेगाव दाभाडे), प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (३२,नाणे ता.मावळ), आदेश विठ्ठल धोत्रे (२९,नाणे,ता.मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (आकुर्डी,पुणे), श्रीनिवास उर्फ सिनू वेंकटस्वामी शिडगळ (४१, समता कॉलनी,वराळे, ता.मावळ) आणि मुख्य सूत्रधार गौरव चंद्रभान खळदे (२९, घर नंबर-१११, कडोलकर कॉलनी,तळेगाव दाभाडे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.
आपल्या वडिलांच्या कानशिलात लगावल्याच्या अपमानाचा बदला म्हणून हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी गौरव खळदे याने पूर्ववैमानस्यातून सुपारी देऊन किशोर आवारे यांची निघृण हत्या घडवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी आणखी तपास चालू असल्याचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी सांगितले.