भोसरीत वार करणारी आळंदीतील 'कोयता गँग'

झोपडपट्टीतील भरकटलेल्या तरुणांची 15 वर्षांपासून गँग
gang
gang sakal

पिंपरी: भोसरीत भर रस्त्यात तरूणावर कोयत्याने वार करणारे गुन्हेगार हे आळंदीतील कोयता गॅंगमधील गुन्हेगार असून अनेकजण नुकतेच कारागृहातून सुटलेले आहे.मात्र कारागृहातून सुटका झाल्यावर गेल्या तिन महिन्यात कोयत्या गॅंगच्या गुन्हेगारांनी अवैध धंदे असो की, औद्योगिक भागातील ठेकेदार दहशत माजविण्याचा प्रकार सध्या जोमात आहे. सर्वसामान्य लोक मात्र त्यांच्या गुन्हेगारीमुळे भयभित असल्याचे चित्र आहे.

आळंदीतील पद्मावती झोपडपट्टी आणि विस्तारित भागात राहणारी तरूण मुले गेली पंधरा वर्षात स्वतःची गॅंग करून गुन्हेगारी कारवाया करत आहे. कोयत्याच्या सहाय्याने खून ही त्यांची विषेषता आहे. यातील काही आरोपी खूनाच्या गुन्ह्यात सजा लागलेली असून कारागृहात होती. मात्र कोरोना काळात त्यांची काही महिन्यांपूरती सुटका झाली. आणि बाहेर आल्यानंतर दहशत माजविण्यास सुरूवात केली. कुणी पॅरोलवर सुटले. तर कुणी कोरोनामुळे सुटले. मात्र त्यानंतर औद्योगिक भागातील ठेकेदार असो की,भाजीविक्रेत्या. अवैध दारूविक्रेत्यांकडून पैसे बळजबरीने गोळा करत.

मात्र त्यांच्याविरोधात कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने कारवाई केली जात नव्हती. काही आरोपी पालिका कार्यालयापुढे तासनतास उभे राहिल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत होत पालिकेत येजा करतो. एवढेच काय आळंदीतील काही मंगलकार्यालयाचालकांकडूनही खंडणी नियमीत घेत असल्याचे नागरिकांमधे चर्चा आहे. सर्व आरोपींकडे चैनीसाठी महागड्या दुचाकी, पायात चार ते पाच हजारांचे बूट,आणि काहींकडे चारचाकी गाड्याही आहेत. आळंदीत सध्या वीस पंचविस गुन्हेगार सध्या छोट्या मोठ्या दहशती करून बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे.

स्थानिक आळंदी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता कोयता गॅंगच्या आरोपीबाबात काही माहित नसल्याचे सांगण्यात आले. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोलवर सुटले की आणखी कोणत्या कारणाने याचीही माहिती पोलिसांकडे नाही. पॅरोल किती दिवसांचा हेही स्थानिक पोलिसांना माहित नाही.

  • - सतत तुरुंगवा-या करणा-या गुंडांसमोर थरथरतो आळंदी परिसर

  • - एमआयडीतील ठेकेदार, मंगलकार्यालय चालकांवर मोठी दहशत

  • - झोपडपट्टीतील भरकटलेल्या तरुणांची 15 वर्षांपासून गँग

  • - खंडणी

दरम्यान याबाबत आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले, झोपडपट्टी गुन्हेगारांबाबत माहिती घेवून कारवाई करण्याची शिफारस मी वरिष्ठांकडे करतो. कोयता गॅंगकडून कुणावर दहशत माजविण्याचा प्रकार होत असेल तर थेट आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com