Girish Bapat : तळेगावी जन्मलेल्या गिरीश बापटांच्या ऋणानुबंधाला उजाळा

सर्वसमावेशी स्वयंसेवक गिरीष : कृष्णराव भेगडे
krushnarao bhegade talks about girish bapat politics talegaon
krushnarao bhegade talks about girish bapat politics talegaonsakal

तळेगाव स्टेशन : गिरिश बापट यांना अगदी बालपणापासून जवळून पाहीलेले जनसंघाचे तत्कालीन स्वयंसेवक आणि मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांना सर्वसमावेशक स्वयंसेवक असे बिरुद लावत यांच्या तळेगावमधील ऋणानुबंधाच्या आठवणी जागवत श्रद्धांजली वाहिली.

३ सप्टेंबर १९५० ला तळेगाव मध्ये जन्मलेल्या गिरीशचे वडील भालचंद्र बापट हे मुळचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील.तळेगावातील ऑर्डनन्स फॅक्टरीत कामास असल्याने ते तळेगाव दाभाडेमध्ये रहिवासास होते.संघातील स्वयंसेवक असलेले

गिरीशचे वडील खरे माझे मित्र.गिरीश माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान.जनसंघाच्या बनेश्वर सायं शाखेत अगदी शिशुवयापासून मी गिरीषला पाहत आलेलो.डोळसनाथ आळीतील शुक्रवार पेठेत सुधाकर नाखरे यांच्या अभ्यास खोली योजनेमध्ये आम्ही विद्यार्थी अभ्यासानिमित्त एकत्र राहायचो.

या अभ्यासखोलीच्या अगदी शेजारी असलेल्या इंदुलकरांच्या वाड्यामध्ये बापट कुटुंबीय राहायचे.याच वाड्यात अतिशय जवळीकीने गिरीशचे बालपण मी पाहिलेले. गिरीशचे प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथे तर, माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले.

साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी

वाणी-ब्राह्मणांचा संघ म्हणून प्रतिमा असलेल्या जनसंघाची तळेगाव दाभाडे शाखा मात्र अगदी या प्रतिमेला छेद देणारी होती.सर्व जाती धर्माच्या तरुणांचा समावेश तत्कालीन शाखेत असायचा. तळेगावातील त्या संघ संस्कृतीत अगदी मुस्लिम आणि ख्रिश्चन तरुणांनाही स्वयंसेवक संघ म्हणून सामील करुन घेतले जायचे.

गिरीशवर तळेगावातील याच सर्वसमावेशक संघ शाखेत संस्कार झाले.तेच संस्कार गिरीशला भावी राजकीय आयुष्यातील कारकिर्दीत कामास आले.तशीच सर्वसमावेशक भूमिका घेत गिरीशने जनसंपर्क वाढवल्याने तो तीन वेळा नगरसेवक ,पाच वेळा आमदार ,पालकमंत्री आणि शेवटी खासदार होऊ शकला. एवढे सर्व जाती धर्माचे जनमत गिरीशच्या पाठीमागे राहिले.सामन्यातील गिरीशमध्ये असामान्य कर्तुत्व पाहायला मिळाले.

मी बऱ्याच वेळा गिरीशला तळेगावातील विविध कार्यक्रमानिमित्ताने पाहुणा म्हणून बोलवायचो. अगदी अलीकडील काळात ऑक्टोबर २०१७मध्ये तळेगाव जनरल हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या नुतनीकरणानंतर लोकार्पणप्रसंगी गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना मला गुरुस्थानी माणणा-या गिरीशने माझा आवर्जुन नामोल्लेख करत,आपल्या जडणघडणीत कृष्णाला भेगडे साहेबांचा मोठा वाटा असल्याची कबूली दीली.एवढया जाणीवेतून कृतज्ञता व्यक्त करायला गिरीशएवढेच मोठे मन लागते. सर्व जाती-धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेणारा सामान्यातला असामान्य कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला.कै.गिरीश बापट यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

- कृष्णराव भेगडे (माजी आमदार-मावळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com