लढाऊ कामगार नेते कॉम्रेड विजयसिंह कदम यांचे कोरोनामुळे निधन

 labor leaders Comrade Vijay Singh Kadam died due to corona
labor leaders Comrade Vijay Singh Kadam died due to corona

पिंपरी : ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाइड कंपनी युनियन (आयटक) सचिव, आयटक महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुणे जिल्हा समिती सचिव कॉम्रेड विजयसिंह कदम (वय 71 ) यांचे कोरोनाने निधन झाले.

हमाल भवनच्याधर्तीवरत्यांनी आकुर्डीत श्रमशक्ती भवन उभारले होते. त्यांनी 1970 च्या दशकात अनेक कम्युनिस्ट नेत्यांनी पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात कामगार संघटना उभ्या करून कामगारांना न्याय देण्याचा संघर्ष केला. त्याच काळात डेव्हिड ब्राऊन कंपनीत (आत्ताची ग्रीव्हज) कामगार संघटना त्यांनी स्थापन केली. आणीबाणीच्या काळात कामगार लढे उभारत असताना पोलिसांचा लाठीमार आणि अटकसत्र त्यांनी सहन केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

''कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या एका लढाऊ नेत्यांचे दुःखद निधन झाले आहे आम्हाला त्यांची कमतरता जाणवेल''
- अजित अभ्यंकर ( अध्यक्ष सिटू)

 "पिंपरी चिंचवड मध्ये पुरोगामी आणि डाव्या विचारांच्या कामगार कार्यकर्त्यांना गेली चार दशके मार्गदर्शन करणारे कॉम्रेड अचानक निघून गेल्यामुळे चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.''
- कैलास कदम ( अध्यक्ष, इंटक)

"या ज्येष्ठ कामगार नेत्याने आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना कामगार चळवळ कशी चालवावी याचे मार्गदर्शन केले,1970 च्या दशकात मालकांच्या गुंडाविरोधात त्यांनी कामगारांच्या बाजूने जशास तसे उत्तर दिले होते.''
- किशोर ढोकले( अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ)

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई; महापालिकेकडून एकाच दिवसात 27 गुन्हे दाखल

"कामगार चळवळीच्या सुवर्णयुगापासून त्यांनी संघर्ष केला,जागतिकीकरण विरोधी संघर्ष समितीच्या लढा,शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी शहरात आमच्याबरोबर आंदोलने केली होती.''
- मानव कांबळे ( अध्यक्ष नागरी हक्क सुरक्षा समिती)

"लाल बावट्यावर अढळ निष्ठा ठेवून चार दशके कामगारांना न्याय देण्यासाठी आयुष्य वेचलेला नेता गेला.''
- गणेश दराडे (अध्यक्ष माकप)

"आकुर्डी येथे श्रमशक्ती भवन उभारण्यासाठी त्यांनी मोठे योगदान केले. कामगारांच्या सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्यांनी आकुर्डीत कामगार भवन उभारले.''
- लता भिसे( अध्यक्षा भारतीय महिला फेडरेशन) 
 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com